लाडकी बहिण योजना अपडेट

Spread the love
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना

महाराष्ट्र सरकार ची महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्यासाठी मुख्यमंत्री माझी‌ लाडकी बहिण योजना ही महाराष्ट्रातील महिलांसाठी खूप मोठा आधार ठरली आहे

आजच्या काळात महाराष्ट्रातील प्रत्येक बहिणच्या तोंडावर एकच नाव आहे. ते म्हणजे ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’. ह्या योजनेने खऱ्या अर्थाने ग्रामीण आणि शहरी भागातील गरजु महिलांना आर्थिक दृष्ट्या बळ दिले आहे. आज आपण या योजनेच्या ताज्या घडामोडींवर आणि अर्जाच्या महत्वाच्या मुद्यावर नव्याने नजर टाकणार आहोत

ह्या योजनेचे खरे महत्त्व काय आहे ?

या योजनेच्या अंतर्गत थेट खात्यात जमा होणाऱ्या रकमेमुळे महिलांना एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण झाला आहे बचत आणि घरातील लागणाऱ्या किराण्यासाठी महिलांना आता कोणापुढे हात पसरवण्याची वेळ येत नाही

महत्वाचे अपडेट ( Latest Update )

नियमित हप्ते : शासनाकडून प्राप्त झालेला निधी सरकार ने जाहीर केल्यानंतर थेट पात्र महिलांच्या खात्यावर जमा होतो

त्रुटीची पूर्तता : ज्या महिलांचा अर्ज करताना काही चुका झाल्या असतील जसे कि नावातील स्पेलिंग मध्ये चुका बॅक खात्याच्या तपशीलात काही चुका अश्या महिलांना त्या चुका दुरुस्त करण्याची मुभा देण्यात आली आहे

नवीन अर्जाचा ओघ : ज्या महिला ह्या योजनेसाठी पात्र आहेत पण अद्याप अर्ज केला नसेल तर त्या महिला अजून देखील विविध डिजिटल केंद्रावर जाऊन अजून देखील अर्ज करू शकतात

जर तुम्हाला ह्या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही खालील निकष तपासून ह्या योजनेसाठी अर्ज करू शकता

पात्रता

१. अर्ज करणारी महिला हि महाराष्ट्र राज्याची अधिकृत रहिवासी असावी

२. वयोमर्यादा २१ ते ६५ वर्षां दरम्यान असावी

३. कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न २.५ लाख रूपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे

४. कुटुंबातील कोणतीही व्यक्ती करदाता नसावी आणि सरकारी नोकरी सेवेत नसावी

अर्ज करताना खालील प्रमाणे कागदपत्राची पूर्तता करणे आवश्यक आहे

आवश्यक कागदपत्रे

१. आधार कार्ड ( बॅक खात्याशी लिंक असलेले पाहिजे )

२. राहिवासी दाखला ( डोमिसाईल/ जन्म दाखला / शाळा सोडल्याचा दाखला )

३. उत्पन्नाचा दाखला

४. बॅक पासबुक ची प्रत

५. पासपोर्ट साईज फोटो आणि हमीपत्र

अर्ज कसा कराल

१. डिजिटल पर्याय : तुम्ही घरी बसल्या तुमच्या मोबाईलवर नारी शक्ती ॲप डाऊनलोड करून अर्ज करू शकतात https://play.google.com/store/apps/details?id=com.saaviinfinet.narishakti_yojana_doot

२. ऑफलाईन पर्याय : अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कार्यालय किंवा सेतू सुविधा केंद्रात जाऊन देखील तुम्ही अर्ज करू शकतात

( टीप : हि माहिती सर्व सामान्य नागरिकांच्या माहिती साठी आणि लोकहितासाठी देण्यात आली आहे . अधिकृत आणि सविस्तर माहितीसाठी शासन किंवा महिला व बालविकास विभागाच्या अधिकृत पोर्टलला भेट द्यावी )

अधिक माहितीसाठी किंवा आमच्या इतर पोस्ट वाचण्यासाठी आमच्या मुख्य वेबसाईट https://marathiguidelines.com/ ला भेट द्या.

Leave a Comment