घरकुल योजना मध्ये नाव आहे का असे तपासा ?

Spread the love
घरकुल योजना लाभार्थी यादी आणि अर्ज करण्याची संपूर्ण माहिती बॅनर
Gharkul Yojana beneficiary list and application guide banner
घरकुल योजनेच्या माध्यमातून तुमचे स्वप्नातील पक्के घर मिळवा.
Check your name in the Gharkul Yojana beneficiary list.

जर तुम्हाला Gharakul Yojana अंतर्गत तुमचे नाव लाभार्थी यादीत आहे की नाही हे तपासायचे असेल, तर हा लेख तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात छोटी-मोठी अशी अनेक स्वप्ने असतात. त्या मध्ये एक मुख्य स्वप्न म्हणजे स्वतः चे हक्काचे घर स्वतः चे घर म्हणजे फक्त चार भिंत आणि छत नसून तो एक प्रकारचा आत्मसन्मान असतो. कुटुंबासाठी सुरक्षिततेचा एक आधार असतो. परंतु वाढती महागाई आणि बेताची आर्थिक परिस्थिती ह्या कारणास्तव अनेक सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या नागरिकांना आयुष्यभर भाड्याच्या घरात किंवा कच्च्या झोपडपट्टीत राहवे लागते.याच समस्येवर मात करण्यासाठी आणि प्रत्येक गरजु व्यक्तीला घर मिळावे यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या कडून ‘प्रधानमंत्री आवास योजना’ (Pradhanmantri Aawas Yojana PMAY) किंवा ‘घरकुल योजना’ अत्यंत चांगल्या प्रकारे राबविली जात आहे. जर तुम्ही किंवा तुमच्या गावातील अथवा ओळखीतील कोण नागरिक ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असेल, तर हा लेख तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि उपयुक्त आहे. या लेखात आपण घरकुल योजनेची सविस्तर माहिती, पात्रता, आवश्यक कागदपत्रे आणि लाभार्थी यादीत नाव कसे तपासायचे ते सविस्तर पाहणार आहोत.

घरकुल योजना म्हणजे काय ?

केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने शहरी आणि ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, अल्प उत्पन्न गटातील आणि भूमिहीन कुटुंबासाठी ज्यांच्याकडे राहण्यासाठी पक्के घर नाही अश्या नागरिकांसाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या अंतर्गत देशातील प्रत्येक गरजु कुटुंबाला मुलभूत सुविधांसह स्वतः चे पक्के घर देणे हा आहे. ह्या योजनेचा उद्देश घर बांधण्यासाठी किंवा कच्च्या घराचे रूपांतर पक्क्या घरात करण्यासाठी शासनाकडून थेट बँक खात्यावर आर्थिक अनुदान (Subsidy) जमा केले जाते. ग्रामीण भागात ही योजना ‘PMAY-Gramin’ आणि शहरी भागात ‘PMAY-Urban’ नावाने ओळखली जाते.

घरकुल योजनेचे प्रमुख वैशिष्ट्ये.

१. आर्थिक सहाय्य: घर बांधण्यासाठी सरकार कडून टप्याटप्याने थेट बँक खात्यात अनुदान दिले जाते त्यामुळे कर्जाच्या जाळ्यात अडकण्याची गरज पडत नाही.

२. पायाभूत सुविधा: या योजनेसाठी मिळणाऱ्या अनुदानासोबतच शौचालय निर्माण, वीज जोडणी, उज्वला गॅस कनेक्शन, यांसारख्या इतर शासकीय योजनांचा लाभ देखील जोडला जातो.

३. स्वतः च्या मालकीचे घर: महिला सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी घराची नोंदणी महिला सदस्याच्या नावावर किंवा संयुक्त नावाने केली जाते.

घरकुल योजनेसाठी पात्रता.

ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनाने काही निकष ठेवले आहेत ते पुढीलप्रमाणे.

१. अर्जदार व्यक्ती भारताचा रहिवासी असावा. त्यांचे कुटुंबीय भारताचे रहिवासी असावेत. ( पती, पत्नी, अविवाहित मुले )

२. अर्जदार किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्याच्या नावावर देशात कुठेही घर नसावे.

३. कच्च्या स्वरूपाची छते आणि भिंती असलेली घरे ज्या कुटुंबाकडे आहे ते ह्या योजनेसाठी पात्र ठरतात.

४. शासनाच्या सामाजिक व आर्थिक जात सर्वेक्षण (SECC) यादीत नाव असलेल्यांना आणि दारिद्रय रेषेखालील (BPL) कुटुंबाला यात प्राधान्य दिले जाते.

५. कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न शासनाने ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त नसावे.

घरकुल योजनेत तुमचे नाव कसे तपासावे.

तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबाने पूर्वी घरकुल योजनेसाठी अर्ज केला असेल, तर तुमचे नाव घरकुल यादीत आहे की नाही ते तुम्ही घरीबसल्या मोबाईल किंवा काॅम्प्युटरवर देखील तपासु शकता. याची सोपी पद्धत पुढीलप्रमाणे दिली आहे.

१. अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या : प्रधानमंत्री आवास योजना च्या अधिकृत पोर्टलवर https://pmayg.dord.gov.in/netiayHome/home.aspx वर जा.

२. ‘Stakeholders’ किंवा ‘Beneficiary’ पर्याय निवडा : संकेतस्थळाच्या मुख्यपृष्ठावर तुम्हाला मेनूमध्ये Beneficiary Details किंवा Beneficiary Search हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.

३. योग्य माहिती भरा : आता तिथे तुम्हाला तुमचे राज्य (State), जिल्हा ( District ), तालुका ( Sub District ), ग्रामपंचायत किंवा गाव ( Village ) निवडावे लागेल.

४. सर्च करा : सर्व माहिती अचूक भरल्यानंतर Search बटणावर क्लिक करा. आता तुमच्या गावातील संपूर्ण यादी तुम्हाला स्कीनवर दिसेल. आता तुम्ही त्यांच्यात तुमचे नाव शोधू शकता. जर तिथे तुमचे नाव असेल, तर तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर आणि मंजुरीची स्थिती पहायला मिळेल.

अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे.

जर तुमचे नाव यादीत नसेल आणि नवीन अर्ज करायचा असेल तर खालीलप्रमाणे कागदपत्रे तयार करून ठेवावीत.

१. आधार कार्ड: अर्जदाराचे आणि कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड.

२. ओळखपत्र : पॅन कार्ड किंवा मतदान कार्ड.

३. उत्पन्नाचा दाखला: तहसीलदार किंवा अधिकृत अधिकाऱ्यानी दिलेला उत्पन्नाचा दाखला.

४. रेशन कार्ड : कुटुंबातील सदस्यांची माहिती देण्यासाठी

५. राहण्याचा पुरावा / सातबारा : जागा स्वतःची असल्यास जमिनीचा सातबारा किंवा मिळकत पत्रिका.

॰ पासपोर्ट साईझ फोटो आणि मोबाईल नंबर

अर्ज कसा करावा. ?

१. ग्रामीण भाग : जर तुम्ही गावात राहत असाल, तर तुम्ही तुमच्या गावातील ग्रामपंचायत कार्यालय, ग्रामसेवक किंवा पंचायत समितीशी संपर्क साधावा.

२. शहरी भाग : जर तुम्ही शहरात तालुक्याच्या ठिकाणी राहत असाल, तर जवळच्या महानगरपालिका कार्यालय, नगरपरिषद किंवा शासनमान्य काॅमन सर्व्हिस सेंटर (CSC) व्दारे ऑनलाईन अर्ज करू शकतात

निष्कर्ष.

‘घरकुल योजना’ ही सर्वसामान्य आणि गरजू नागरिकांसाठी वरदान ठरली आहे. शासनाच्या या प्रकल्पामुळे लाखों कुटुंबाला चांगला आधार मिळाला आहे. त्यांना हक्काचे घर मिळाले आहे. तुमच्या परिचयातील कोणी व्यक्ती ह्या योजनेपासून वंचित असेल.तर लवकरात लवकर आपली पात्रता तपासा आणि योग्य कागदपत्रासह अर्ज करा.

तुम्हाला माहिती कशी वाटली ? हे आम्हाला नक्की सांगा आणि तुमच्या गरजू मित्र-परिवारासोबत सोशल मीडियावर नक्की शेअर करा.

अधिक माहितीसाठी किंवा आमच्या इतर पोस्ट वाचण्यासाठी आमच्या मुख्य वेबसाईट https://marathiguidelines.com/ ला भेट द्या.

Leave a Comment