PM Kisan Beneficiary List: घरबसल्या असे तपासा तुमचे नाव.

Spread the love
PM Kisan Yojana Beneficiary List
पीएम किसान योजनेच्या माध्यमातून तुमचे नाव कसे तपासायचे

प्रत्येक शेतकरी कुटुंबाच्या आर्थिक विकासासाठी आणि शेतीचा दैनंदिन खर्च भागविण्यासाठी केंद्र व राज्य सरकार कडून विविध प्रकारच्या लोककल्याणकारी योजना राबविण्यात येतात. त्यामध्ये देश आणि महाराष्ट्रातील कोट्यवधी शेतकऱ्यांचा समावेश आहे. ती योजना म्हणजे ‘प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजना’ (PM Kisan Samman Nidhi Yojana) हि अत्यंत महत्त्वाची गेम-चेंजर ठरली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत दिली जाते. ( PM Kisan Beneficiary List )

जर तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती शेती करत असेल, तर हा लेख तुमच्यासाठी हा लेख अत्यंत महत्त्वाचा आहे. या लेखामध्ये आपण पीएम किसान योजनेचे स्वरूप त्यासाठी लागणारी पात्रता, लाभार्थी यादीत नाव कसे तपासायचे आणि हप्त्याची स्थिती कशी तपासायचे त्याबाबत सविस्तर माहिती पाहणार आहोत.

पीएम किसान योजना म्हणजे काय ? ( PM Kisan Beneficiary List)

केंद्र सरकार मार्फत देशातील अल्प आणि सीमांत शेतकरी कुटुंबांना आर्थिक आधार देण्यासाठी त्यांच्या शेती विषयक गरजा पूर्ण करण्यासाठी ‘पीएम किसान योजना’ या योजनेच्या माध्यमातून पात्र असलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला दरवर्षी ६००० ची आर्थिक मदत दिली जाते

हि आर्थिक मदत शासनाकडून शेतकऱ्यांच्या आधार सीडींग असलेल्या बॅक खात्यावर थेट जमा केली जाते. एका वर्षामध्ये प्रत्येकी २००० रूपयांचे तीन समान हप्ते दर चार महिन्यांच्या अंतराने दिले जातात. त्यामुळे आता शेतकऱ्यांना इतर शेतीची कामे करण्यासाठी कोणाच्या कडून अव्वाच्या सव्वा भावाने कर्ज काढण्याची गरज भासत नाही.

योजनेसाठी आवश्यक पात्रता काय आहे ? ( PM Kisan Beneficiary List )

पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकार कडून काही कडक नियम ठरवून दिलेले आहेत. कारण फक्त गरजू आणि खऱ्या शेतकऱ्यांना ह्या योजनेचा फायदा मिळावा हा त्यामागील उद्देश आहे.

१. जमिनीची मालकी: ज्या शेतकऱ्यांच्या किंवा त्यांच्या कुटुंबाच्या नावावर शेतजमीन आहे, तेच केवळ ह्या शेतकरी योजनेसाठी पात्र ठरतात.

२. कुटुंब मर्यादा: या योजनेचा लाभ पती पत्नी किंवा त्यांची अल्पवयीन मुले ह्या सगळ्यांना एकत्र मिळतो.

अपात्रता

जर शेतकरी किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणी सदस्य हा प्राप्तीकर (Income Tax) भरत असेल.

जर ती व्यक्ती केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या नोकरीत असेल किंवा मासिक पेन्शन १०,००० पेक्षा जास्त असेल.

व्यावसायिक डाॅक्टर, वकील, इंजिनियर किंवा चार्टर्ड अंकाऊन्ट असलेले व्यक्ति ह्या योजनेसाठी पात्र नाहीत.

लाभार्थी यादीत तुमचे नाव कसे तपासायचे.

तुमच्या गावातील किंवा शहरातील लाभार्थी यादीत तुमचे नाव आहे का.ही प्रकिया पूर्णपणे ऑनलाईन आणि सुलभ आहे. लाभार्थी यादीत तुमचे नाव शोधण्यासाठी पुढील पायऱ्या तुम्ही वापरू शकतात.

१. अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या : सर्वात पहिले तुमच्या मोबाईलवर अथवा संगणकावर पीएमओ किसानची अधिकृत पोर्टल उघडा. https://pmkisan.gov.in/

२. PM Kisan Beneficiary List वर क्लिक करा : वेबसाईट वर Beneficiary List हा पर्याय निवडा. जो तुम्हाला वेबसाईटच्या होमपेजवर खाली स्क्रोल केल्यानंतर दिसेल.

३. तुमची महसूल माहिती निवडा.: तिथे विचारलेली सर्व माहिती अचूक वाचा. आणि ती काळजीपूर्वक भरा.

  • राज्य (State) : महाराष्ट्र
  • जिल्हा (District) : तुमचा असलेला जिल्हा निवडा.
  • तालुका (Sub-District) : तुमचा असलेला तालुका निवडा.
  • गट (Block) : तुमचा असलेला गट निवडा.
  • गाव (village) : तुमचे असलेले गाव निवडा.

४. रिपोर्ट पहा : सर्व माहिती योग्य आणि अचूक भरल्यानंतर खाली दिलेल्या Get Report ह्या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुमच्या समोर तुमच्या गावातील संपूर्ण लाभार्थी यादी दिसेल त्यात तुम्ही तुमचे नाव सहज शोधू शकतात.

तुमच्या हप्त्याची स्थिती तपासा आणि पैसे आले का नाही ते कसे चेक करावे ?

तुमच्या बॅंक खात्यावर शेतकरी सन्मान योजनेचा निधी शासनाकडून प्राप्त झाला कि नाही किंवा तुमचा पुढील हप्ता अडकला आहे का हे पाहण्यासाठी खालीलप्रमाणे कृती करा.

  • सर्वप्रथम पीएम किसानच्या मुख्य पृष्ठावर उजव्या बाजूला ‘Know Your Status’ या पर्यायावर क्लिक करा.
  • तुमचा नोंदणी क्रमांक प्रविष्ट करा. ( जर तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक माहित नसेल, तर बाजूला दिलेल्या ‘Know Your Registration Number’ ह्या पर्यायावर क्लिक करून मोबाईल नंबर टाकून आणि OTP भरून काही सेकंदात तुम्ही तो मिळवू शकता.)
  • स्क्रिनवर दिसत असलेला Captcha Code अचूक भरून ‘Get Data’ वर क्लिक करा.
  • तुमच्या समोर अर्जाची सविस्तर माहिती येईल. त्यात मागील हप्त्याची तारीख, बॅक खात्याचे नाव आणि पुढील हप्त्याची स्थिती हे सगळे स्पष्टपणे दिसून येईल.
ई-केवायसी (e-KYC) करणे आवश्यक आहे का ?

पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता नियमितपणे चालू ठेवण्यासाठी प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्यांना e-KYC करणे शासनाकडून बंधनकारक करण्यात आले आहे.

  • जर का तुमची e-KYC पूर्ण नसेल तर तुमचा हप्ता तात्पुरता थांबवला जाऊ शकतो
  • e-KYC करण्यासाठी तुम्ही जवळच्या CSC सेंटरवर जाऊन बायोमेट्रिक व्दारे किंवा मोबाईलवर ( Face Authentication ) चेहऱ्याद्वारे देखील करू शकतात.आणि रजिस्टर मोबाईल नंबर च्या OTP व्दारे देखील तुम्ही तुमची e-KYC पूर्ण करू शकतात.जर का तुम्ही मोबाईल व्दारे e-KYC ती अगदी मोफत आहे.

निष्कर्ष.

शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकार ची ही योजना अत्यंत उपयुक्त ठरत आहे. वरील सोप्या पद्धतीचा उपयोग करून तुम्ही घर बसल्या तुमच्या अर्जाची स्थिती तपासून शकतात.

हा लेख तुम्हाला कसा वाटला ? याबद्दल काही शंका किंवा अडचण असल्यास आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत हा लेख नक्की पोहचवा

धन्यवाद

अधिक माहितीसाठी किंवा आमच्या इतर पोस्ट वाचण्यासाठी आमच्या मुख्य वेबसाईट https://marathiguidelines.com/ ला भेट द्या.

Leave a Comment